एकनाथ शिंदे : मागास जिल्हयात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आवडता प्रोजेक्ट ज्याने गडचिरोलीची 'मागास जिल्हा' ही ओळख बदलली!
एकनाथ शिंदे ह्यांनी गडचिरोलीत नवे तंत्रज्ञान आणले आहे. राजकीय नेत्यांच्या ठायी दूरदर्शीपणा आणि विकासाची ओढ असेल तर त्यांच्या अंतर्गत क्षेत्राचा विकास होऊ शकतो. तसेच काहीसे घडले आहे नक्षलग्रस्त आणि मागास जिल्हा गडचिरोली च्या बाबतीत. तत्कालीन पालकमंत्री आणि वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तंत्रज्ञानाची कास धरुन तेथील ग्रामीण आणि आदिवासी कुटुंबांना आणले आहे राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात !
(इंडिया इनपुट डेस्क)
घर किंवा इमारतींचा आधार कार्ड ही संकल्पना कशी वाटते?
व्यक्तींची ओळख कशी आधार कार्ड ने होते.. जवळ जवळ त्याप्रमाणे आता घरांची, इमारतींची ओळख विशिष्ट कोड्स द्वारे होते आहे , आपल्या महाराष्ट्रात ! -असे सांगितले, तर आपल्यापैकी कित्येकांचा कदाचित विश्वास बसणार नाही.
महाराष्ट्रातील सर्वात मागास जिल्हा आणि नक्षली प्रभावित जिल्हा अशी ओळख असलेल्या आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ही किमया तत्कालिन नागरी विकास मंत्री आणि वर्तमान मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी तिथे करून दाखवली आहे. याद्वारे, विकासा पासून वंचित क्षेत्राला , आदिवासीं कुटुंबांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील करून शासन त्यांचे दारापर्यंत प्रत्यक्ष पोहोचविण्यात यश मिळाले आहे.
या स्कॅनीफाय कोडस चा वापर करून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घन कचरा संकलन आणि व्यवस्थापनाचे कार्य तीन नगर परिषद आणि नऊ नगर पंचायत क्षेत्रांत सुरु झाले आहे. त्यामुळे, कचरा संकलन आता अधिक नियमित, शास्त्रीय आणि सुसुत्रतेने सुरू झाले आहे. कोणी गैरहजर राहिले, कामचुकारपणा किंवा वेळ काढूपणा केला, तर त्याची तात्काळ ओळख होते. एखाद्या घरातून किंवा वस्तीतून सुका आणि ओला कचरा वेगवेगळा देण्यात येत नसेल तर त्याची ओळख करून त्यांना नेमके समजाविण्यात सुलभ होते. या तंत्रज्ञानाचा वापर यापुढे कर निर्धारण आणि संग्रहण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत होऊ शकेल.
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे प्रशंसक आहेत. त्यांनी स्वतः महाराष्ट्र विधानसभेत नुकतेच मोदींविषयी प्रशांसोदगार काढले. ‘स्वच्छ भारत अभियान’ हा मोदींचा आवडता प्रोजेक्ट आहे, तसाच तो शिंदे यांचा देखील आहे.
मविआ सरकारमध्ये राज्याचे नागरी विकास मंत्री असताना सप्टेंबर 2021 मध्ये त्यांनी घन कचरा संकलन आणि व्यवस्थापन करिता माहिती संवाद तंत्रज्ञान आधारित (आय सी टी) स्कॅनिफाय कोड प्रणाली चा वापर करण्याचे शासन निर्णय जारी केले. शिवाय, तेव्हा श्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने सर्व 12 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत हे तंत्रज्ञान राबविण्याचे निर्देश दिले. आज स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्व स्थानिय स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रांत हे तंत्रज्ञान राबविणारा गडचिरोली हा राज्यात पहिला जिल्हा ठरला असून देशात देखील ह्या जिल्ह्याचा पहिला क्रमांक असल्याचे सांगितले जाते.
या पारदर्शी ऑनलाईन प्रणाली अंतर्गत सर्व घर, इमारती आणि मालमत्तेवर विशिष्ट स्कॅनिफाय कोड लावण्यात आले असून त्यांचे जिओ टैगिंग करण्यात आले आहे. कचरा संकलनाच्या नंतर हे कोड स्कॅन करण्यात येतात ज्याद्वारे स्थळ, दिवस, वेळ या माहिती सोबतच कचरा वर्गीकृत की संमिश्र अशी सर्व माहिती तात्काळ डेटाबेेस मध्ये नोंदली जाते. या शिवाय, स्वच्छ भारत अभियान करिता आवश्यक वेगवेगळ्या रिपोर्ट्स एक क्लिक सरशी उपलब्ध होतात. ज्यायोगे कर्मचाऱ्यांचा वेळ, मेहनत आणि सरकारी निधी आदींची बचत होते.
ना. एकनाथ शिंदे यांच्या दूरदर्शीपणा मुळे आणि आय ए एस अधिकारी तसेच गडचिरोली चे जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या प्रशासनिक कौशल्याने गडचिरोली सारख्या जिल्ह्याचा कायापालट होण्यास असा धडाक्यात आरंभ झाला.