#नवरात्री आणि स्त्रीचा प्रवास : आरोग्य, समृद्धी, स्त्रीत्व..
देवीच्या नव रूपांतून स्त्रीच्या जीवनातील टप्पे, आरोग्य आणि उत्कर्षाचा मार्ग

#नवरात्री आणि स्त्रीचा प्रवास : आरोग्य, समृद्धी, स्त्रीत्व..सध्या खुप छान पवित्र वातावरण आहे। कारण सध्या नवरात्रीचे दिवस आहेत। नवरात्रीतीळदेवी दुर्गा आपल्यासमोर वेगवेगळया रूपांनी येते, दुर्गामाता म्हणजे साक्षात एक अपूर्ण,अलौकिक तेजस्वी चैतन्य ! सर्व देवांची शक्ती एकत्र होऊन एक सर्वश्रेष्ठ देवता म्हणून आपण दुर्गादेवीची मनोभावे पुजा करतो। ही देवी नऊ रूपामध्ये नऊ शक्तीसह आपल्यासमोर येते, खडतर तपस्या सौम्यता, हिम्मत, धैर्य, शौर्य, चैतन्य,वात्सल्य, संरक्षक, बुद्धी, स्वाभिमानता असे अनेक गुण !

या दुर्गामातेचं आपल्या आयुष्यात वैद्यकिय दृष्टीने काय महत्त्व आहे ? तसंही आपल्या भारतीय संस्कृतीत नवरात्रीत कन्यापुजजा करतात। त्यामुळे सुरूवात ही मुलीच्या जन्माचे स्वागत करूनच केली पाहिजे।
“नवरात्री व स्त्री आरोग्य “
– डॉ. सुषमा देशमुख, स्त्रीरोग तज्ञ ।
देवीचे पहिले रूप – माँ शैलपुत्री।

शैलपुत्री म्हणजेच हिमालयपुत्री – हिमालयाची मुलगी, गौरवणाची तेजस्वी पण शात स्वभावाची. शैलपुत्री म्हणजे बाल्यावस्थेतील लडिवाळ गोड मुलगी आईवडिलांची, कुटुंबाची सर्वांची आवडती। हे रूप म्हणजे मला पौगंडावस्थेत प्रवेश करणाऱ्या मुलीसारखे वाटते। या वयातील मुलींना घरातुन, पालकांकडुन खुप प्रेमाची वागणूक मिळाली पाहिजे।
आई – बाबांनी तिचे आरोग्य, शिक्षण आणि संस्कार यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। कधी कधी या छोटया मुलींना पण गायनॅकॉलॉजीकल प्रॉब्लेमस् असू शकतात। तसेही हे वय कोवळे व निष्पाप असते। त्यामुळे तिला बाहेरील जगापासून सावध करावे। गुड टच, बॅड टच बद्धल माहिती द्यावी, शिस्तबद्ध व्यायाम, पौष्टिक आहाराची सवय लावली पाहिजे।
https://youtu.be/8kYt3KS7uwA?si=vsFWeCGHAuqQt3lR
देवीचे दुसरे रूप – माँ ब्रम्हचारिणी ।

हे रूप म्हणजे देवी पार्वतीचे सन्यासी तपश्चर्या, वैरागी वृत्तीचे प्रतिक आहे हे रूप मला शाळा कॉलेज शिकणाऱ्या विद्यार्थेनींचे वाटते म्हणझे यूवावस्था। अशीच तपश्चर्या मुलींनी आपल्या शिक्षणासाठी केली पाहिजे, म्हणजे खडतर तपश्चर्याचं व्रत ! शिक्षण करियर या ताणतणाबाला तोंड देता आलं पाहिजे, त्यासाठी आरोग्यही चांगलं हवं,चागला पौष्टिक आहार व व्यायाम हवा। मुलींनी या तपशचर्ये बरोबर च मोबाईल, इंटरनेटयापासून दूर राहिल पाहिजे। स्वत:चे उद्दिष्ट ठरवलं पाहिजे, तसेच ध्येयापासून विचलीत न होता शांतपणे, तणावरहित लक्ष केंद्रित केलं पाहिजे।
https://youtu.be/4m2WGKadODU?si=CrBRF_FxHX9H_Q5r
देवीचे तिसरे रूप – माँ चंद्रघण्टा ।

हे रूप म्हणजे पार्वतीचे वैवाहिक रूप आहे। भगवान शिवशंकराकडून तिला भेट म्हणून डोक्यावर चंद्रदेव अपणासारखं मिळाल। देवी चंद्रघण्टा स्त्रीचे एक असामान्य झळाळतरूप, जी स्वतंत्र आणि स्वतःच्या पायावर उभी आहे। न्यायासाठी आग्रही आहे। प्रसंगी तिच्या हक्कांसाठी लढा लढणारी आहे। आणि सकारात्मक उर्जा देणारी, विवाहानंतर येणारे आरोग्याचे प्रश्न तिने सोडवले पाहिजेत। योग्य वयात योग्य निर्णय घेता आला पाहिजे. ते
ही स्वतःचे आरोग्य सांभाळून। हा निर्णय Pre conceptual counseling असो किंवा मुल न होणाऱ्या स्त्रियांसाठी
असो, त्यांनी योग्य उपचार वेळीच घ्यावे। निर्भय होऊन कुठे झुकावे, कुठे झुकवावे हे कळले पाहिजे।
देवीचे चौथे रूप — माँ कुष्मांडा।

श्री महादेवांनी पार्वतीदेवीला तिचा खन्या अस्तित्वाची येथे जाणीव करून दिली। मला हे रूप म्हणजे पतीने, पत्नीचे यण विशेष ओळखून त्याला एका अत्युच्य शिखरावर नेण्यासारखे आहे। स्त्रीला आदिशक्ती म्हणतात ते उगीच नाही। कृष्मांडा म्हणजे संसार उमा करणारी, श्रँगार, रचनात्मक, कलात्मक, अवघं ब्रम्हांड रचणारी, झळाळत्या सौंदर्याची
स्त्री। तिच्यापासून नव्या जीवाची उत्पत्ती होणे हे विधात्याला पडलेल सुंदर स्वप्न। त्यामुळे नवा जीव उत्पन्न करणारी गर्भावस्थेतील स्त्री मला इथे दिसते। गर्भवती स्त्रीयांनी आनंदी असणे, स्वत:विषयी, बाळाविषयी माहिती मिळवणे, योग्य आहार, विश्रांती घेणे हे खुप आवश्यक आहे। तसेंच योगासने, ओंकार, गायत्रीमंत्र, प्राणायाम, व्यायाम डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे करावेत । गर्भसंस्कार म्हणजेच सामाजिक, बौद्धिक, नैतिक, अध्यात्मिक अशा संस्काराचा पाठपुरावा करणे। त्यामुळे पहिला संस्कार आईवर होतो । व नकलडतच त्याची मुहुर्तमेढ बालावर रोवली जाते।
देवीचे पाचवे रूप – माँ स्कंदमाता

देवीचे पाचवे रूप म्हणजे स्कंदमाता। म्हणजेच पार्वती देवीचे कार्तिकेय बरोबरचं रूप । हे मातृत्वाचे प्रतिक आहे ।माता वात्सल्य बाळाचे संगोपन म्हणजे स्कंदमाता , शिवपार्वतीच्या असामान्य शक्तीतुन सहा मुखांचा म्हणजे षण्मुख कार्तिकेय जन्मला ।अशा अभुतपुर्व बाळाची आई मंहून देवी पार्वतीला स्कंदमाता म्हणतात । यामध्येय देवी सुवर्णमय कांतीची अपूर्व तेजाची व बाळाचे पालनपोषण करणारी शांत स्वभावांची आहे । मला हि देवी म्हणजे parenting सुजाण पालकत्वाची वाटचाल दखवणारी वाटते ।आजच्या या संगणक युगात खरंच अशा आईची गरज आहे ।आपण याचे उदहारण म्हणजे राजे शिवाजी व जिजामाता घेऊ शकतो। मुलामुलींना सांग्यान करणं, त्यांचे पोषण सकस आहाराने करणं त्यांना योग्य मार्गदर्शन कारण हे तर जरूरीच आहे पण आज कितीतरी मुलंमुली व्यसनांना बळी पडत आहे ।लैया मोबाइलला , चुकीच्या मार्गावर निधावलेल्या मानाने पाऊ पडत आहे। त्यामुळे आई मुलगी , आई मुलगा हे नातं सर्वाथाने रूढ झालं पाहिजे ।
Credit to :

To be continued…
SOURCE : sushma.citt@gmail.com
https://youtu.be/8kYt3KS7uwA?si=vsFWeCGHAuqQt3lR
Catchup for more on : http://indiainput.com
#MiG-21: The Final Sortie of India’s Sky Warrior “Type 77”..
#MiG-21: The Final Sortie of India’s Sky Warrior “Type 77”..
#Zubeen Garg : Assam sings in tribute to their musical Icon…
#Zubeen Garg : Assam sings in tribute to their musical Icon…
Gen Z India : Rooted and Rising, Spiritual and Nationalist!!
Gen Z India : Rooted and Rising, Spiritual and Nationalist!!



