Kashi: काशी बदलली.. काशीवासी कधी बदलणार?
रुंदीकरण, सौंदर्यीकरण झाले. काशीचे रहिवासी मानसिकता कधी बदलतील? विचारताहेत पर्यावरण प्रेमी, संशोधक विजय लिमये..
काशी नगरीत प्रचंड लक्षणीय बदल घडले आहेत. रुंदीकरण, सौंदर्यीकरण झाले. छान कॉरिडॉर झाला! तेथील लोकसभा सदस्य आणि देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने काशी चे रूप पालटले खरे, पण येथील बहुतांश रहिवासी आपल्या वर्तणुकीतील अपेक्षित बदल दाखवायला केव्हा पर्यंत देशाला प्रतीक्षा करायला लावणार आहेत? स्वच्छ भारत करण्यासाठी आपल्या मानसिकतेत सुधारणा कधी दाखवणार? पर्यावरण प्रेमी, संशोधक आणि लेखक विजय लिमये यांचा झणझणीत अंजन घालणारा लेख..
काशी.. वाराणसी, बनारस या नावांनी देखील परिचित असलेले भारतातील एक अत्यंत पौराणिक अशी ख्याती असलेले शहर. प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात काशीला जाऊन यावे असे सनातन धर्मात म्हंटले आहे. भारतातील अनेक राजे रजवाड्यांनी काशीत गंगातीरी स्वतःचे महाल बांधलेले दिसून येतात.
माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदींचा खासदार या नात्याने शहराला परिस स्पर्श लाभलेला आहे. असे असूनही, अजूनही म्हणावे तितके स्वच्छ, सुंदर, नीटनेटके शहर झालेले दिसत नाही याची कारणेही अनेक आहेत. घाटांच्याकडे जाणारे रस्ते हे आजच्या युगात विचार करता, गल्ल्याच होत्या. दोन्ही बाजूचे अतिक्रमण तोडून सर्व रस्ते मोठे करण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला गेलेला दिसत आहे, त्यामुळे ट्रॅफिक जाम हे आता जवळजवळ नसल्यासारखेच आहे.
दशांश्वमेघ घाटावर होणारी गंगा आरती मात्र मन मोहून टाकते. आरतीचे सादरीकरण अप्रतिम असते. जवळपास एक तास चाललेली आरती ट्रीप चे पैसे वसूल करण्यात मोलाचे सहकार्य करते.
खाण्याच्या बाबतीत वाराणसी जगप्रसिद्ध आहे. तिथे असंख्य प्रकारचे चाट, समोसे, मिठाई प्रकार जागोजागी मिळतात. दुग्धजन्य पदार्थ, मलार्ईयो, रबडी सगळीकडे मोठ्या प्रमाणात मिळते.
काशी बदलली.. काशीवासी कधी बदलणार?
वास्तव असे आहे, शहर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवले पाहिजे, ही मानसिकता शहरवासीयांच्यात आजिबात नाही. सर्व सायकल रिक्षा चालक, ऑटो चालक, टपरी वाले, ठेलेवाले, टॅक्सी चालक, आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर खर्रा खावून पचापच थुंकतात. आपण त्यांचे गिऱ्हाईक आहोत, याचा कोणताच विधिनिषेध त्यांच्यात नाही. आपण जी रिक्षा ठरवली, त्यात बसायला सुरुवात करताच, रिक्षा चालक पचकन आपल्याच पायाशी चुळ भरल्याप्रमाने थुंकतो. थुंकीचे काही शिंतोडे आपल्या पायावर उडतात त्याची किळस, आपण वाटून घ्यायची नसते. काही शिंतोडे रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीच्या पायावर उडतात. इतके सर्व होत असताना, या विषयावरून तिथे बाचाबाची, मारामारी होताना एकही घटना घडलेली मी पाहिली नाही.
रस्त्यावर चालताना लाल थुंकीवर आपण कितीही प्रयत्न केला तरी, आपला पाय पडणे चुकवू शकत नाही. थोडक्यात सार्वजनिक रस्ते ही वाराणसी वासियांची अधिकृत थुकदाणी आहे.
काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन, कॉरिडॉर मधून एक नंबर गेट पार करून, पस्तीस चाळीस पायऱ्या उतरून गंगा नदीचा ललिता घाट लागतो. वरून दिसणारे नदीचे विहंगम दृश्य मोहित करते. नदीत असंख्य लहान मोठ्या नावा फिरताना दिसतात. वाराणसीत येणारे पर्यटक या नावेतून बसून सगळे घाट फिरून येतात. नदीकिनारी उभे राहून वाहते पाणी पहा, नदीच्या दुसऱ्या घाटावर वालुका बेट आहे, एक मात्र नक्की, चुकूनही लीलिता घाटाच्या बाजूच्या घाटावर लक्ष देऊ नका. हाच तो मणिकर्णिका घाट, जिथे प्रेताची आग कधीच विझत नाही. या घाटावर दिवसाला सरासरी ऐशी ते शंभर प्रेतांचे दहन होते.
दिवसभर घाटावर प्रेत जळत असल्याने, त्याचा धूर तसेच राखेचे बारीक कण नदीकडून येणाऱ्या वाऱ्याने ललिता घाट तसेच विश्वनाथ मंदिराच्या आवारात पसरतात. यातून मंदिराचे पावित्र्य वाढते की कमी होते हे केवळ विश्वनाथच सांगू शकतील. मणिकर्णिका घाट अतिशय घाण, गलिच्छ, नरकासारखा आहे. तिथे दहन केल्याने मोक्ष मिळतो हे कदाचित यासाठी सत्य असावे की, मृतात्मा म्हणत असेल; “इतक्या घाणेरड्या जागेत माझ्या शरीराचा, दहन विधी केल्याने, माझ्या शरीराची झाली तेवढी अवहेलना पुरे झाली, आता मला पुढचा जन्मच नको” म्हणजेच मला मोक्ष द्या, सद्गती प्राप्त हो.
नातेवाईक प्रेताला तिरडीवर बांधून सरळ नदीपर्यंत जातात, तिथे चार खांदेकरी तिरडीसहित प्रेताला नदीच्या पाण्यात बुडवतात, “ही झाली प्रेताची अंघोळ”. लगेच तिरडीसहित प्रेताला तिथेच आसपास रचलेल्या लाकडाच्या सरणाजवळ आणतात. प्रथेनुसार धार्मिक विधी पूर्ण करून प्रेत सरणावर ठेवले जाते आणि स्थानिक डोंब राजाकडून विकत घेतलेल्या अग्निने दहनविधी सुरू होतो. पंतप्रधान मोदींनी अमाप खर्च रस्ते सुशोभीकरण, घाट, सौंदर्यीकरण यावर केलेला आहे, परंतु, मणिकर्णिका घाट या योजनेतून संपूर्ण वगळलेला दिसतो आहे.
काशी बदलली.. आता मानसिकता सुधारणे गरजेचे!
साधारण तीन वर्षांपूर्वी वाराणसी गंगाकिनारी नमो घाट सुरू झाला आहे जो प्रेक्षणीय आहे. लहान मुलांची खेळणी, तसेच बोटितून विहार वगैरे मनोरंजनाच्या सुविधा या घाटावर उपलब्ध आहेत.
एकूणच स्थानिक लोकांची राहण्याची पद्धत, आणि मानसिकता पाहून हे शहर सुधारण्यासाठी अजून कित्येक दशके वाट पहावी लागणार आहे, हे स्पष्ट जाणवले.
विजय लिमये
भ्रमण ध्वनी: 9326040204.
(images: http://www.pexels.com)
Related link:
मोक्षकाष्ठ वाले विजय लिमये..जो पेडोंको जीवनदान देते हैं!
Make in India जगा रहा उम्मीदें, बढ़ा रहा रोजगार!
https://indiainput.com/make-in-india-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%82-%e0%a4%ac%e0%a5%9d%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%be/
POSTCARD MAN: ग्रामीण मार्केटिंगके जादूगरसे मिलीये!
Gaukriti इस गौकृति कागज से पौधे उग आते हैं।
शहद कितना शुद्ध है? शहद के नाम पर आप क्या खरीद रहे हैं?
2000 NOTE TO EXIT. IS IT MODI’S STRIKE AGAINST VOTE BUYERS?
https://indiainput.com/2000-note-to-exit-is-it-modis-strike-against-vote-buyers/
AMAZON IS IN THE EYE OF A STORM IN INDIA. READ TO KNOW WHY.
https://indiainput.com/why-are-indian-traders-angry-against-amazon/
IS CRYPTO SAFE? HERE IS ALL YOU NEED TO KNOW.
https://indiainput.com/is-crypto-safe/
Indiainput.com is keen to contribute in spreading more awareness on the world of economy, online payment apps, business trends and related happenings, current trends in the related issues & key information, Latest Research and allied topics. You are welcome to share experience or feedback on contactindiainput@gmail.com
Dear valued Readers and Supporters, at IndiaInput.com, YOU are the heart of everything we do! Your unwavering support has fueled our passion for delivering top-notch news and insights on a wide array of topics. We deeply appreciate the time you spend with us, making our journey so meaningful. Your favorite online news magazine Indiainput.com celebrates YOU and the association with you. We’re incredibly grateful for your selection and in joining us on this remarkable adventure. Together, let’s continue to create a brighter, exciting & knowledge-filled journey to a more rewarding future!