TechTrendsमराठी

Digital Transactions नोकऱ्या घेणार, जग बदलणार आहे..!!

Alert warning! हा सावधतेचा इशारा आहे! जगणे सोपे करणारे संगणकीय वित्त व्यवहार (संविव्य) म्हणजे डिजिटल ट्रांसॅक्शन जगणे कठीण करू शकेल! वाचा..संशोधक, विचारक विजय लिमये काय सांगताहेत!

Digital TransactionsDigital transactions म्हणजे संगणकीय वित्त व्यवहार (संविव्य) मुळे सतर्क किंवा सावधान राहण्याची आज गरज आहे. सांगणिकीय वित्त व्यवहार (संविव्य) आल्याने आपले दैनंदिन जगणे रोखे रहित म्हणजे कॅशलेस होऊ घातले आहे खरे, पण त्यामुळे, खूप बदल घडणार, कित्येक नोकऱ्या जाणार आहेत. अशा वेळी, हे लक्षात घेतलेच पाहिजे, की संकटाला जो संधी समजून सोने करतो तोच पुढे जातो, हे इतिहासाने मानवजातीला शिकविले आहे! संशोधक, विचारक विजय लिमये सांगतात हे संकट आहे आणि संधी देखील !

 

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैशाची देवाणघेवाण इतकी सहजतेने होऊ शकते ही कल्पना सुद्धा दहा वर्षांपूर्वी भारतीयांनी केलेली नव्हती. कोविड रोग आला आणि त्याने भारतीयांची विचारसरणीच बदलून गेली. पैशाच्या देवाण घेवाणीतून रोग पसरतो, हे समजल्यावर पैशाला हात लावणे सुद्धा मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आणि संगणकीय वित्त व्यवहार (संविव्य) हे माध्यम चितपरिचित झाले. भाजीविक्री, केसकर्तन पासून मोठे व्यवहार देखील संविव्यतून होऊ लागले.

 

वास्तविक अगदी 2017 पासून या व्यवहाराची सुरुवात पेटीएम Paytm नावाच्या कंपनीने केली होती, परंतू जनतेने त्यांच्या या व्यवहारात करोना येईपर्यंत फारसा उत्साह दाखवला नाही.

 

खरंतर या प्रकारचा रोग आला नसता तर आजही खरेदी, विक्रीत परंपरागत चलन देवाणघेवाण सुरु ठेवली असती, यासाठी करोनाला एक प्रकारे धन्यवादच द्यावे लागतील.

 

आजपावेतो तीन वेळा नोटबंदी झाली होती! सर्वात प्रथम सन 1946 मध्ये इंग्रजांनी नोटबंदी आणून पाच हजार, दहा हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार केल्या. अगदी तसेच जनता पक्षाच्या राजवटीत मोरारजीभाई सरकारने 1975 साली पाच हजार, दहा हजार रुपयांच्या नोटा नाहीश्या केल्या. 2016 मध्ये मोदींनी एक हजार रुपयांच्या नोटेला हद्दपार करून काही काळापुरते, दोन हजार रुपयाची नोट बाजारात आणली आणि त्याच वेळेस या नोटेला भविष्यात रद्दबदल करण्याचे आराखडे मांडण्यात आले.

 

हळूहळू भारतातील मोठ्या रकमेच्या नोटांचे व्यवहार बंद झाल्यामुळे रुपये 2000 च्या नोटेला आम व्यवहारात फारसे महत्त्व राहिले नाही. काही दिवसापूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडियाने सर्व दोन हजार रुपयांच्या नोटा परत मागवल्या आणि मोठ्या संख्येच्या नोटेला पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहायची वेळ आली.

 

Digital Transactions

 

संविव्य भारत हे फार मोठे यश भारताला प्राप्त झालेले आहे. अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्राला अजून इतक्या सहजतेने संविव्य जमले नाही, ते भारताने सहज आत्मसात केले, यासाठी यूपीआय (Unified Payments Interface)या प्रणालीला शंभर पैकी शंभर मार्क द्यावे लागतील. नॅशनल पेमेन्ट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांनी यूपीआय प्रणाली तयार केली आहे.

 

याच गतीने भारताने प्रगती केल्यास, तो दिवस फार लांब नाही, ज्या दिवशी पाचशे, दोनशे, व शंभर रुपयांच्या नोटा सुद्धा हद्दपार होतील. तो देशासाठी क्रांतिकारक दिवस ठरेल, आणि ते लवकरच व्हावे ही सदिच्छा.

 

संविव्य शंभर टक्के यशस्वी झाल्यास काळा पैसा नाहीसा होईल, चोरी, पाकिटमारी थांबेल, सरकारचा नोटा छपाईवर होणारा करोडो रुपयांचा खर्च वाचेल ज्यामुळे उच्च दर्जाचा आयात केलेला कागद लागणारच नाही, त्यातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचेल. काही प्रमाणात का होईना भ्रष्टाचाराला आळा बसेल, सर्व वित्तीय व्यवहारात पारदर्शकता येईल, कर वसुली सुलभ होईल, अनेक व्यापाऱ्यांच्या कर बुडवेगिरीवर आळा बसेल, सरकारी तिजोरीत जास्त कर जमा होईल.

 

एटीएम (ATM) यंत्रे कालबाह्य ठरतील. एटीएम यंत्रे तयार करणाऱ्या कंपन्यांना ही धोक्याची घंटा आहे हे समजून घ्यावे, “नाहीतर त्यांचा नोकिया होईल.” सुजाण नागरिकांना मी काय म्हणतोय हे समजले असेल. बँकेत कॅशियर अर्थात रोखपाल पद निघून जाईल. अनेक बँका आपल्या शाखा कमी करतील, बँकेत कर्मचारी वर्ग सुद्धा कमी लागेल, थोडक्यात आज जितके कर्मचारी आहेत त्याच्या अर्ध्याहून कमी लागतील. कॅश घेऊन येणारे-जाणारे कर्मचारी तसेच त्यांना संरक्षण देत गाडीतून कॅश नेणाऱ्या अनेक एस्कॉर्ट कंपन्यांना दुसरे उद्योग शोधावे लागतील. थोडक्यात काय तर आजचे अनेक बँक व्यवहार येणाऱ्या काळात कालबाह्य होणार, जसे पासबुक मिळणार नाहीत, फिक्स डिपॉझिट सारखे व्यवहार संविव्यतून होतील, रोखपालाची जागा राहणार नाही, वगैरे. तसेही गेल्या काही वर्षांपासून चेकबुक कुरियर ने घरपोच पाठवतात, चेकबुकची गरज सुद्धा नाममात्र राहील, वगैरे.

 

संगणकीय वित्त व्यवहाराने अनेक रोजगार जातील, त्याच बरोबर इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजीमधील नोकऱ्या वाढतील. तरुणांनी या सर्व उलथा पालथीचा सखोल अभ्यास करावा आणि त्या नुसार आपला अभ्यासक्रम निवडावा.

 

कोणत्याही संकटाला संधीत रूपांतर करणारा श्रेष्ठ ठरतो. पाहूया येणाऱ्या संकटाला कोण कसे संधीत रूपांतर करतात.

 

विजय लिमये

भ्रमण ध्वनी: 9326040204

 

(images: http://www.pexels.com)

 

 

Related links:

 

Paytm
Paytm is facing RBI restrictions.

“Paytm के स्थान पर अन्य पेमेंट एप पर शिफ्ट हों!”

https://indiainput.com/paytm-3092-2/

 

Interim Budget 2024
Interim Budget 2024: The Union Finance minister with the MoS, before going to present the budget. (image: ANI)

Interim Budget 2024: A Relook, a week later!

https://indiainput.com/interim-budget-2024/

 

Make in India

Make in India जगा रहा उम्मीदें, बढ़ा रहा रोजगार!

https://indiainput.com/make-in-india-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%82-%e0%a4%ac%e0%a5%9d%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%be/

 

POSTCARD MAN: ग्रामीण मार्केटिंगके जादूगरसे मिलीये!

https://indiainput.com/postcard-man-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97/

 

eco friendly

Gaukriti इस गौकृति कागज से पौधे उग आते हैं।

https://indiainput.com/gaukriti-%e0%a4%87%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9c-%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8c%e0%a4%a7%e0%a5%87-%e0%a4%89%e0%a4%97-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a5%88%e0%a4%82/

Honey

शहद कितना शुद्ध है? शहद के नाम पर आप क्या खरीद रहे हैं?

https://indiainput.com/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%b9%e0%a5%88/

 

2000 Note
The note will remain in transaction at least till September end this year. (Image: Wikipedia)

2000 NOTE TO EXIT. IS IT MODI’S STRIKE AGAINST VOTE BUYERS?

https://indiainput.com/2000-note-to-exit-is-it-modis-strike-against-vote-buyers/

Amazon
Traders protesting by burning effigies.

AMAZON IS IN THE EYE OF A STORM IN INDIA. READ TO KNOW WHY.

https://indiainput.com/why-are-indian-traders-angry-against-amazon/

 

Crypto Currency

IS CRYPTO SAFE? HERE IS ALL YOU NEED TO KNOW.

https://indiainput.com/is-crypto-safe/

Indiainput.com is keen to contribute in spreading more awareness on the world of economy, budgets, the online payments, digital transactions, business trends and  related happenings, current trends in the related issues  & key information, Latest Research and allied topics. You are welcome to share experience or feedback on contactindiainput@gmail.com

Dear valued Readers and Supporters, at IndiaInput.com, YOU are the heart of everything we do! Your unwavering support has fueled our passion for delivering top-notch news and insights on a wide array of topics. We deeply appreciate the time you spend with us, making our journey so meaningful. Your favorite online news magazine Indiainput.com celebrates YOU and the association with you. We’re incredibly grateful for your selection and in joining us on this remarkable adventure. Together, let’s continue to create a brighter, exciting & knowledge-filled journey to a more rewarding future!

Visit some of our important Internal Links
Administration related news & inputs:
Spotlight related news & inputs:
Startup related news & inputs:
Innovation related news & inputs:
Specials in our news & inputs:
Infrastructure related news & inputs:
Industry related news & inputs:
Trends in news & inputs:

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

seven + 3 =

Back to top button