Mahashivratri..कसा झाला श्रीक्षेत्र महानागबळेश्वर (दातपाडी) येथे जत्रोत्सव!

Mahashivratri महाशिवरात्री सुवर्णमहोत्सवी जत्रोत्सवास शिवभक्तांनी श्रीक्षेत्र महानागबळेश्वर शिवशक्ती देवस्थान (दातपाडी) येथे मोठी गर्दी केली होती. सुवर्णमहोत्सवी जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तरवाहीनी नागनदीच्या किनारी व मध्यद्विपात शिवभक्तांची अलोट गर्दी झाली होती.
श्रीगणेशपुजनाने पुजेला सुरवात झाली, निशान चढविण्यात आले, शिवशक्ति_ अर्धांगीपार्बतीचा रुद्राभिषेक करण्यात आला तेव्हा चिमन्या-पाखरांनी मंगल सुर लावला होता. पक्षांचे झुंडच्या झूंड आकाशात विविध आकृत्यांनी आकाश आच्छादित होते. वेद-मंत्रोच्चाराने सर्व देवी -देवतांचे श्री महानागबळेश्वर पिंडी, रूद्र हनुमंत, शनिदेव, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ , चौ-याबाबा, भुराभगत, नागद्वारस्वामी, नंदिकेश्वर आदींचे पुजन करण्यात आले. विस्वस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री देविदास ठवकर यांनी सपत्निक पुजन करून घटाची ज्योत प्रज्वलीत केली. सकाळी ७.२० वाजता महाआरती होऊन नारळ वाढवून जत्रोत्सवास सुरवात झाली.
विविध मंडळांनी गावोगावच्या पायी दिंड्या आणल्या होत्या तर शिवभक्तांनी नवसाचे बाण (त्रिशुल) आणलेत. डफ, डमरूं , विवीध वाध्यांच्या गजराने वेगवेगळा पोहा येत होता. जसजशी गर्दी वाढत होती तसतशी पाोलिस यंत्रणा, होमगार्ड्स व सेवेकरी यांनी भक्तांसाठी दर्शन सुविधा सांभाळली. कुही पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक श्री.पिदूरकर यांनी जातीने लक्ष देवून बंदोबस्त कडक ठेवला होता. पहिल्या दिवशी विविध भजनीमंडळांनी भजनांद्वारे जत्रेस रंगत आणली. श्री रमेश लांजेवार यांच्या संगितमय भजनात भक्त नाचू, डोलू लागले होते. बाजार खुलून गेला होता. नदीपात्रातील श्री महानागबळेश्वराच्या पिंडी दर्शनासाठी लोकांची खुप गर्दी झाली होती. विविध साधू, संत, महंतांनी येथे आपली उपस्थिती लावली होती. मॉ नर्मदाष्टक उपासना मंडळाचे मुख्य समन्वयक व नदी अभ्यासक श्री कीशोर पौनिकर यांनी उत्तरवाहीनी नदीचे महत्व सांगताना तिच्या काठी जप, ध्यान, पुजन, आरती केल़्याने पुण्य शंभरपटीने वाढत असल्याचे सांगितले आहे.
सेवेक-यांनी हातसाखळी करून गर्दीतून महिला-पुरूषांना दर्शनाची सोय करून दिली होती. विदर्भच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून, छत्तिसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश येथील यात्रेकरूंनी दर्शनाचा लाभ घेतला. विविध मंडळांनी व देवस्थानकडून ३ क्विंटल साबुदाना खिचडीचा फराळ वाटण्यात आले.
दुस-या दिवशी पारणे असल्याने पंचक्रोशीतील भाविकांनी पाचपावली पुजन आटोपून जत्रेस मोठ्यासंख्येने गर्दी केली होती. कोणी महाप्रसादासाठी भाजीपाला, धान्य, तेल, दही आदी विविध साहित्य आणून दिले. किर्तनकार ह .भ.प .श्री कैलाशराव वाघाये महाराज यांचे सुमधूर कीर्तन झाले. किर्तनातून त्यांनी हिन्दूंनी सामाजिक एकात्मता राखून संगठीत राहून मंदीरांसाठी खुल्या हाताने दान करण्यास सांगितले. मंदीरे राहीतील तरच आपणही राहू हे पटवून दिले. “यारे यारे अवघे जन” या अभंगाधारीत किर्तनाने भाविकाचे मन मोहून गेले.
मा.श्रीमंत योगी मुधोजीराजे भोसले, नागपूर यांनी किर्तनाचा लाभ घेतला असून, त्यांचे शुभहस्ते दहीहंडी फोडण्यात आली. महाआरती, गोपाळकाला व कढईचा प्रसाद वितरण करण्यात आल्यानंतर महाप्रसादास सुरूवात झाली. तर १ लाख २० हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असून २० हजारावर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
एकंदरीत सुवर्णमहोत्सवी जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. जत्रोत्सवाच्या या कार्यात श्रीक्षेत्र महानागबळेश्वर शिवशक्ती देवस्थान (दातपाडी) चे विस्वस्त मंडळ, कार्यकर्ते, संत गजानन महाराज (जीएमके) चे सेवेकरी, पंचक्रोशीतील सेवेकरी व सहका-यांनी खुप मेहनत घेतली आहे.