#नवरात्री आणि स्त्रीचा प्रवास:आरोग्य, समृद्धी, स्त्रीत्व-२
देवीच्या नव रूपांतून स्त्रीच्या जीवनातील टप्पे, आरोग्य आणि उत्कर्षाचा मार्ग

#नवरात्री आणि स्त्रीचा प्रवास : द्वितीय भाग। आरोग्य, समृद्धी, स्त्रीत्व..सध्या खुप छान पवित्र वातावरण आहे। कारण सध्या नवरात्रीचे दिवस आहेत। नवरात्रीतीळदेवी दुर्गा आपल्यासमोर वेगवेगळया रूपांनी येते, दुर्गामाता म्हणजे साक्षात एक अपूर्ण,अलौकिक तेजस्वी चैतन्य ! सर्व देवांची शक्ती एकत्र होऊन एक सर्वश्रेष्ठ देवता म्हणून आपण दुर्गादेवीची मनोभावे पुजा करतो। ही देवी नऊ रूपामध्ये नऊ शक्तीसह आपल्यासमोर येते, खडतर तपस्या सौम्यता, हिम्मत, धैर्य, शौर्य, चैतन्य,वात्सल्य, संरक्षक, बुद्धी, स्वाभिमानता असे अनेक गुण !

या दुर्गामातेचं आपल्या आयुष्यात वैद्यकिय दृष्टीने काय महत्त्व आहे ? तसंही आपल्या भारतीय संस्कृतीत नवरात्रीत कन्यापुजजा करतात। त्यामुळे सुरूवात ही मुलीच्या जन्माचे स्वागत करूनच केली पाहिजे।
“नवरात्री व स्त्री आरोग्य “
– डॉ. सुषमा देशमुख, स्त्रीरोग तज्ञ ।

देवीचे सहावे रूप — मॉ कात्यायनी।
हे देवी पार्वतीचं लढाऊ रूप। विरांगनेचं रूप। जेव्हा राक्षस महिषासुराचे पृथ्वीलोक, देवांवर अत्याचार सुरू झाले, तेव्हा त्याला अडवण्यासाठी सर्वांनी महाशक्तीची आराधना केली।आणि एका पवित्र यज्ञातुन दशभुजा देवी पार्वती कात्यायनमुनींची मुलगी म्हणुन अतिशय मनमोहक पण तेवढीच आक्रमक विविध आयुधांनी सज्ज अशी कात्यायनी जन्मली व तिने महिषासुराचा वध केला। ही देवी आपल्याला सबल होण्यास शिकवते। दहा आयुध म्हणजेच विद्या, तंत्रज्ञान, संरक्षण आणि वेगवेगळया कलेत निपुण असणे, ज्यामुळे स्त्री स्वत:चे संरक्षण तर करेलच पण समाजावर पण मायेची पाखर घालेल। दुर्बलांना अभय देईल, तसेच वेगवेगळया स्त्री-आजारांवर मात करते। मला देवीचे हे रूप पण खुप आवडते। देवी नकळत आपल्याला स्त्री सबलीकरणाचा मंत्र देते। प्रत्येक स्त्रीने स्त्रीला आधार दिला पाहिजे। घरी असो वा बाहेरची। यामुळे स्त्रीयांवरचे अत्याचाराचं ६०–७० प्रमाणात कमी होतील। स्त्रीयांचे या वेगवेगळया काळात येणारे प्रश्न वेळीच लक्ष नाही दिले तर राक्षसासारखे उग्र रूप धारण करू शकतात, उदा. पॉलीसिस्टिक ओव्हरीयन। ससिन्ड्रोम, कॅन्सर गर्भवस्थेतील वेगवेगळे त्रास अतिस्त्रावी मसिकपाळी । म्हणून कात्यायनी देवीला खरंच दंडवत ।
https://youtu.be/L9SBXNZ8Q4s?si=oVhkxRqRtjMwZnUh

देवीचे सातवे रूप — मॉ कालरात्री।
देवीचं सातव रूप म्हणजे कालरात्री। हे पार्वतीदेवीचे रूप म्हणजे विध्वंसक दुष्टांचा नायनाट करणारे असे पुर्णपणे रौद्ररूपात्त पुढे येते। स्त्रीया अबळा समजू नका। तिने जर तिची क्षमता ओळखली आणि त्यापुढे गेली तर अख्ख जग पायाखाली आणु शकते। ही स्त्री अनायाविरुयुद्ध पेटून उठते । समाज बाचवण्याचा प्रयत्न करते। यात तो खरी आक्रामक असते। व दुष्टांचे निर्दालन करण्यात मागे पुढे पद्यात नाही। अशा अनेक स्त्रिया आपल्या आजूबाजूला आहेत । पोलीस, आर्मीमध्ये दुष्टांवर तुटून पडणाऱ्या, कोरोनासारख्या अद्श्य शक्तीशी लढा देणाच्या, या रणरागिणी आहेत । हा असा बाणा प्रत्येक स्त्रीमध्ये असला पाहिजे। तिच्या आजारावर किंवा इतर स्त्रीयांच्या त्रासासाठी तिने जंग जग पछाडलं पाहिजे। आजच्या युगात प्रत्येक स्त्रीमध्ये हे गुण असणे जरूरी आहे। मुली, स्त्रिया शिक्षण करीयरमुळे घराबाहेर पडल्या आहेत। मानवातील महिषासुर तिला कळला पाहिजे। खोटया मृगजाळात फसु नये। ती एवढी महान असावी की सगळ्या आजार त्रास, यांना तोंड दिलं पाहिजे। अशा स्त्रियांचे समर्थ हात आपण सर्वानी आणखी ब्लडकात केले पाहिजे ।अशा अनेक पेशंट मंहून माहिति आहेत। एकटीच लड्ढा देणारी समथपन्ने सर्व प्रश्ण तोलणारी।
माझ्या पुस्तकात “जगावेगळी माणसे जगावेगळया गोष्टी’ मध्ये अशा
स्त्रियांचे मी वर्णन केले आहे। हे मला भावणारं आणखी एक रूप! वाईट प्रवृत्तींविरूद्ध
लढणारी, दुष्टांची संहारक, अंधारातुन प्रकाशाकडे नेणारी आशा, विश्वावाचे मुर्तीमंत रूप ।
https://youtu.be/WRfPMYbf-0M?si=NviGHJufpFcBhhoK

देवीचे आठवे रूप – मॉ महागौरी
देवीचं आठवं रूप हे महाकाली नंतरचं। त्यामध्ये तिचे रौद्ररूप नॉर्मल अवस्थेत येतं। कालीच्या भयानक रूपानंतर, ब्रम्हदेवाच्या आदेशानुसार देवी पार्वती मानस सरोवरामध्ये डुबकी घेऊन बाहेर येते। ती पुर्ण बदलूनच! शांत, सोज्वळ रूपात। मला ‘ही महागौरी Homemaker म्हणजे पूर्ण कुटुंबाची काळजी घेणारी, मायाळू, प्रेमस्वरूप स्त्री वाटते। ही
स्त्री तिच्या पतीलाही प्रत्येक बाबतीत पाटिंबा आधार देते। तसेच मुलाघरातील इतरांची पण काळजी घेते। एक आदर्श स्त्री, पत्नी, ग्रहीणी, माता असे वैविध्यपूर्ण रूप। पण माझ्या दृष्टीने ही स्त्री खुप सजग असते। एखाद्या डॉक्टससारखी ही स्त्री सर्वांची काळजी घेते। मला या देवीमध्ये प्रौढावस्थेतील स्त्री दिसते। आयुष्यातील चढ–उतारामुळे तिला प्रगल्भता आली असते ।कुठल्याही संकटाना शांतपणे तोंड देउन मार्ग काढणारी असते। माझ्या गोष्टीच्या ‘जगावेगळी माणसे जगावेगळ्या गोष्टि ‘ कांहीं स्त्रिया अगदी अशाच आहेत ।मला स्त्रीचें हे रूप पण खूप भावतं। पण कुटुंबबरोबरच या स्त्रीनें स्वतः चे आरोग्य जपले पाहिजे । हिमोग्लोबिन चांगलं असावं। आयर्न कॅलसिमयुक्त आहारकडे लक्ष असावे। स्वतः व्यायाम कारवा।मेडिकल प्रश्नाचे लगेच निवारण करावे ।या वयातील स्तिथत्यंतराना मानसिक व शारिरिक उदा। कॅन्सर , अतिस्रावी मासिकपाळी ह्रिदयविकार मधुमेह असं हे देवीचं लुभावणार सोज्वल स्वरूप ।
https://youtu.be/4m2WGKadODU?si=vkWNqsBXIqAOBzdI

सीद्धीदात्री — हे देवीचे नववं रूप ।
यामध्ये देवी पार्वती तिच्या अत्युच्च व सर्वोच्च रूपात असते। देवी महाशक्तीचं हे प्रतिक आहे। विविध कलागुणांनी संपन्न असते। ही स्त्री म्हणजे सर्वोच्च पदावर विविध शक्त्तींनी परिपुर्ण असलेली स्त्री! ती ज्ञान देते, चांगुलपणा शिकवते। अशा स्त्रिया म्हणझे एक सुंदर अविष्कार असतो। या स्त्रियांमध्ये अहंकार नसतो। प्रेम, वात्सल्य व ज्ञानाचे तेज असते
सर्वांना सांभाळायची विलक्षण ताकद, शक्ती असते।
https://youtu.be/8kYt3KS7uwA?si=ggTLV1KWE6fUlnLc
मला वाटतं आपल्या संस्कृतीने आपल्याला खूप काहीं दिलय। नवदुर्गेच्या या सर्वगुणांच जागर झालाच पाहिज़े। व नवदुर्गेच्या आशीर्वाद घेऊन आरोग्य निरामय व निरोगी बनवा पाहिजे ।
जर पुर्ण स्त्रीशक्ती एकत्र आली तर मानवातील, आजारातील शबत्रुंचे महिषासुराचे निर्दालन होईल!
Credit :

Source :
https://youtu.be/8kYt3KS7uwA?si=0VCiiUkf5JXympH4
Catchup for more on : http://indiainput.com
#नवरात्री आणि स्त्रीचा प्रवास : आरोग्य, समृद्धी, स्त्रीत्व..
#नवरात्री आणि स्त्रीचा प्रवास : आरोग्य, समृद्धी, स्त्रीत्व..
#MiG-21: The Final Sortie of India’s Sky Warrior “Type 77”..
#MiG-21: The Final Sortie of India’s Sky Warrior “Type 77”..
#Zubeen Garg : Assam sings in tribute to their musical Icon…
#Zubeen Garg : Assam sings in tribute to their musical Icon…
Gen Z India : Rooted and Rising, Spiritual and Nationalist!!
Gen Z India : Rooted and Rising, Spiritual and Nationalist!!
PM Narendra Modi’s B’day :A Global Celebration of Leadership?
PM Narendra Modi’s B’day :A Global Celebration of Leadership?



