AC sleeper busses: बसेस की धावणाऱ्या कॉफिन्स? RTO हे वाचा!
खाजगी बस ने प्रवास करताय? त्यांना आधी हे प्रश्न विचारून घ्या!
AC sleeper busses त्यांच्या वर्तमान स्थितीत कितपत सुरक्षित आहेत? प्रवाशांचा जीव धोक्यात घालायचा नसेल तर, त्यांचेवर बंदी घालणेच योग्य ठरणार नाही का? अलीकडे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २६ जणांचा जीव गेला. त्या घटनेतून कितीतरी प्रश्न उभे झाले. त्या प्रश्नांचा सखोल मागोवा घेणारा हा लेख.
संजय रमाकांत तिवारी
विमान प्रवासा दरम्यान आपली फ्लाईट टेक ऑफ होण्या आधी विमानात आपल्याला आपात्कालीन स्थितीत काय करायचे, कसे वागायचे त्या विषयी माहिती देण्यात येते. एक्झीट डोर्स आणि ऑक्सिजन मास्क बद्दल सांगण्यात येतं. तसंच सगळ्या लांब पल्ल्याच्या, रात्री प्रवासाच्या बसेस मध्ये प्रवाशांना सुरक्षे संबंधी सांगणं आणि एक्झीट ची दारे कोणती आहेत ते कुणीच कधीच सांगत नाही. संकट समयी कुठून आणि कसे बाहेर पडायचे, प्रवाशांना ह्याची माहिती देण्याचा विचार ही खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांना आजतागायत शिवलेला नाही. कुठे तरी तसा नियम असू नये काय? नसल्यास, तो करण्यात येऊ नये काय? त्याची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक नाही काय?
अर्थात् ते चूक नाही. पण, अधिक योग्य ठरेल जर त्यात काही प्रश्न जोडली आणि पूर्वीच्या प्रश्नांच्या आधी ही विचारली तर. उदाहरणार्थ, प्रवास करत असलेली बस स्लीपर कोच असेल तर तुम्हाला इच्छा असो वा नसो, प्रवास भर सतत पडून राहावे लागते. तिथेच तुमची अत्यावश्यक सामान असलेली बॅग, पाण्याची बॉटल वगेर तुम्ही ठेवलेले असते. अशावेळी, तुम्हाला हालचाल करण्यासाठी देखील पुरेशी जागा उरत नाही. रात्रीचा प्रवास असल्याने दिवे (लाईट्स) मालावलेले असतात. तुम्ही पडद्यामागे असल्याने तुम्हाला अंधारात फारसे दिसण्याची शक्यता नसते. अशा वेळी शक्य आहे, की दुर्दैवाने अपघात झाला तर तुम्ही त्याच जागेवर फसून (pinned अवस्थेत) राहू शकता. स्लीपर कोच मधील तुमच्या जागेवरून निघून सरपटत किंवा उभे राहून अंधारात आणि कोलाहलात तुमचे एक्झिट दारा पर्यंत जाणे कोणत्याही अग्निदिव्यापेक्षा कमी नाही. तुमच्या आजूबाजूला तुमच्या पेक्षा सशक्त व्यक्ती असतील तर विंडो ग्लास फोडून आधी ते सुरक्षित बाहेर पडण्याची शक्यता अधिक असू शकते.
– आपत्कालीन परिस्थितीत विंडो ग्लास मधून एक्झिट घ्यायची असेल त्या परिस्थितीत उपयोग होईल असे हैमर्स कुठे उपलब्ध असतील?
संकट समयी काच फोडून बाहेर पडता यावे, ह्या करिता हैमर्स म्हणजे हातोडी आवश्यक असतात. संकट समयी हाताशी हातोडी असेल तर सुटके करिता कमी वेळ लागतो. अशा हैमर्स काचेच्या पेटीत पण सर्व प्रवाशांना दिसेल आणि संकट समयी सहजगत्या काढता येईल, अशा ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे.
खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांनी बसेस चालवून भक्कम नफा कमविण्यात काही गैर नाही. त्याचप्रमाणे, आपण प्रवाशी जर स्वतः जिवंत आणि सुस्थितीत राहण्याची इच्छा करीत असू तर त्यात काही चुकीचे नाही. तसे करण्यात काहीही गैर संवैधानिक नाही.