KIRIT SOMAIYYA: किरीट सोमैय्या व्हिडिओ चॅट नंतर काय होणार?
"एक जायेगा, तो सब जायेंगे," नितेश राणे ह्यांचे सूचक वाक्य! भाऊ तोरसेकरांनी केले सखोल विश्लेषण!! आता कुणाचे बुरखे जाणार?
Kirit Somaiyya किरीट सोमैय्या कथित व्हिडीओ चॅट क्लिप्स चे प्रकरण आणि त्या अनुषंगाने काही महिलांचे कथित पणे शोषण केल्याचा जो आरोप झाला त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारले असता भाजप आमदार नितेश राणे ह्यांनी ‘सत्या’ ह्या हिंदी चित्रपटा मधील डायलॉग बोलून दाखविला आणि त्यानंतर राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर ह्यांनी आपल्या यूट्यूब चॅनल वर त्यांच्या तर्कसंगत शैलीत त्यामागील शक्यता उलगडून दाखवली. त्यांनी केलेला उलगडा ऐकला तर किरीट सोमैय्या ह्यांना चारित्र्यावरून बदनाम करणाऱ्या मंडळींना स्वतःच्या चारित्र्यावरून आणि भूतकाळातील कृतींमुळे नजीकच्या भविष्यात प्रचंड अडचण येऊ शकते, असे दिसते. काय म्हणाले राणे आणि तोरसेकर, बघू या.
(इंडिया इनपुट मुंबई ब्यूरो)
Kirit Somaiyya व्हिडीओ चॅट प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन सुरुवात झालेली आहे. राजकीय गैरप्रकार आणि भ्रश्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आणणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या खाजगी जीवनात डोकावणे आणि चारित्र्यावरून चिखलफेक करणे हा प्रकार घडल्याने हे प्रकरण गम्भीर वळण घेऊ शकते आणि झाकण्याचा प्रयत्न झालेली अनेक गंभीर प्रकरणे आता ह्याच शैलीत धक्कादायक रीतीने बाहेर निघतील, हे स्पष्ट झाले आहे.
ह्यावर, अधिवेशनाच्या दरम्यान विधान भवन परिसरात पत्रकारांनी विचारले असता भारतीय जनता पार्टी चे आमदार नितेश राणे ह्यांनी “सत्या चित्रपटाचा डायलॉग आठवतो काय’ असे विचारून “इस धंदे में एक जायेगा, तो सब जायेंगे,” असे सूचक वाक्य केले !
त्यापूर्वी, अगदी एक दिवस आधी नितेश राणे ह्यांनी नेहमीच्या आक्रमक पद्धतीने एक ट्विट केले होते, हे येथे उल्लेखनीय.
ह्या ट्विट मध्ये त्यांनी ‘दिशा सालियन हत्ये प्रकरणी राज्य सरकारने विशेष चौकशी दलाची (एस आय टी) घोषणा केली होती त्याचे स्मरण करून दिले आणि अशी एस आय टी स्थापन करून चौकशी ला आरंभ होऊ द्या, अशी मागणी केली. ट्विट च्या शेवटी ते ‘न्याय झालाच पाहिजे’, असे म्हणाले आहेत.
भाऊ तोरसेकर काय म्हणाले..
नितेश राणे ह्यांच्या विधानावर बोलताना ज्येष्ठ विश्लेषक भाऊ तोरसेकर आपल्या व्हिडिओत म्हणतात की, हा फार गंभीर इशारा आहे. किरीट ह्यांना व्यक्तिगत चारित्र्यावरून गुंतवणार असाल तर आरोप करणाऱ्या अन्य पक्षांतील लोकांच्या क्लिप मध्ये आणि सी सी टी व्ही क्लिप्स मध्ये अडकवून नागडे केले जाणे शक्य आहे, असा ह्याचा अर्थ शक्य आहे. किरीट सोमैय्यांना त्यांच्या खाजगी प्रकरणावरून गोत्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या क्लिप्स अन्य कुणी सुरक्षित काढून ठेवलेल्या असू शकतात अशी स्पष्ट शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे.
राणे पिता पुत्रांनी दिशा सालियन हत्ये प्रकरणात आजू बाजूच्या इमारतीतील सीसी टी व्ही फुटेज कुठे गेले हे प्रश्न वारंवार विचारलेले आहे. असे सांगून, ते हा प्रश्न वारंवार उकरून कां काढतात असे विचारले आहे. फुटेज गायब झाल्यानंतर ज्यांना त्यांची विल्हेवाट लावण्यास सांगण्यात आले असेल त्यांनी त्याची विल्हेवाट न लावता ते सुरक्षित ठेवले असल्याची शक्यता भाऊंनी व्यक्त केली आहे. निर्णायक वेळी ते बाहेर काढण्यात येतील की काय अशी आपल्याला वारंवार शंका येत होती असे ते म्हणाले आहेत.
हा इशारा असावा अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली आहे. आज शहरात पावलापावलावर सी सी टी व्ही कॅमेरे आपल्या एक एक हालचाली टिपत असतात. कोरोना काळात हॉटेल्स च्या वेळांवर मर्यादा असताना उद्धव ठाकरे ह्यांचे एक चिरंजीव मित्र मैत्रिणींसोबत उपनगरातील एका हॉटेल मध्ये ‘एन्जॉय’ करीत असल्याचे सी सी टी व्ही व्हिडीओ भाजपच्या मोहित कंबोज ह्यांनी काढले होते ह्याची त्यांनी आठवण करून दिली आहे.
असे चित्रीकरण कुठे कुठे कुणा कुणाचे असू शकते आणि ते कुणी कुणी बाजूला काढून ठेवलेले असू शकते, ह्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली आहे. तत्कालीन पोलीस महानिरीक्षक परमबीर सिंग ह्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि राज्यपाल ह्यांना पाठवलेल्या चार पानी पत्रात अशाच एका घडामोडीचा संदर्भ दिला होता ह्याचे स्मरण ही भाऊंनी करून दिले आहे. पोलीस निरीक्षक सचिन वाझे हा तत्कालीन गृह मंत्री अनिल देशमुख ह्यांच्या शासकीय निवास स्थानी वेग वेगळ्या वाहनांतून केव्हा केव्हा येत असे, किती वेळा थांबत असे ह्याचा उल्लेख करून, तेव्हा तेथील सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेण्यात यावे, अशी पत्राद्वारे मागणी त्यांनी केली होती. त्यांचेकडून कारवाई होत नसल्याचे पाहून श्री सिंग ह्यांनी न्यायालयात याचिके स्वरूपात ते पत्र पाठवले होते. भाऊ तोरसेकर ह्यांनी म्हटले आहे की सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज चा उल्लेख हा गर्भित इशारा असू शकतो आणि श्री सिंग ह्यांनी ते फुटेज कुठे सुरक्षित ठेवले असल्याचे तसेच ‘माझ्या वाकड्यात शिराल तर ते बाहेर काढीन’ असे त्यांनी सूचित केलेले असू शकते.
शासकीय गुप्तचर यंत्रणा बड्या बड्या व्यक्तींच्या संबंधी माहिती, त्यांच्या विषयी गुप्त तपशील आणि डेटा गोळा करत असतात पण त्या तत्कालीन सत्ताधारी मंडळींना त्यांनी दिल्याच असतील असे नाही.
समकालीन सत्ता धारी मंडळींना आवडेल अशी माहिती त्यांना देऊन त्यांना अडचणीत आणणारी माहिती त्यांना ना देता भविष्यासाठी सुरक्षित ठेवली जाते, असा प्रघात असतो. विरोधी पक्षांचे नेते असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी केलेल्या गौप्यस्फोट आणि त्यांना तसेच गिरीश महाजन ह्यांना मुद्दाम फसविण्याच्या कटाशी संबंधित वकिलाच्या कार्यालयातील फुटेज चा पेन ड्राईव्ह विधानसभेत सादर केल्याचे भाऊंनी श्रोत्यांना स्मरण करून दिले आहे.
भाऊ तोरसेकर ह्यांचा संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा:
https://youtu.be/CNTGsshylhw
पार्श्वभूमी
Kirit Somaiyya किरीट सोमैय्या ह्यांचे एका महिलेसोबत व्हिडीओ कॉल वरील कथित व्हिडीओ चॅट क्लिप ‘लोकशाही’ नामक एका मराठी वाहिनीने दाखवली. महाराष्ट्र विधिमंडळाचे २०२३ ह्या वर्षाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले त्याच्या ऐन मुहूर्तावर घडले. त्यावर, ह्या क्लिप्स ची आणि सोबत करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी व्हावी अशी एका पत्राद्वारे मागणी केली. त्यानंतर, विधान मंडळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे ह्यांनी अशा विविध महिलांच्या सोबत असलेल्या काही कथित व्हिडीओ चॅटिंग च्या क्लिप्स एका पेन ड्राईव्ह मधून राज्य सरकारला सुपूर्द केल्या. ह्यात सुमारे ३५ व्हिडीओ क्लिप्स असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी कुणालाही पाठीशी न घालता चौकशी होईल अशी सभागृहात ग्वाही दिली. ह्या सर्व घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या चौकशीत सत्य काय ते समोर येईलच. मात्र, ह्या संदर्भात भाजप आमदार नितेश राणे आणि ज्येष्ठ पत्रकार तसेच लोकप्रिय राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर ह्यांनी केलेली विधाने आता चर्चेत आली आहेत.
वास्तविक पाहता, भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या ह्यांची गेली काही वर्षे भ्रष्टाचारी लोकांचा कर्दनकाळ अशीच झाली आहे. ह्यांनी भ्रष्टाचाराची कितीतरी प्रकरणे एक हाती उकरून काढल्याने कित्येक नेते मंडळींचे बिंग बाहेर आले. ती भली मोठी यादी इथे देणे संयुक्तिक होणार नाही. मात्र, त्यापैकी काहींना तुरुंगात जावे लागले, हा नजीकचा इतिहास आहे. अर्थातच, त्यामुळे कितीतरी बडी धेंडे नाराज होणे स्वाभाविक आहे. केवळ एक नव्हे तर तब्बल पस्तीस क्लिप्स गोळा करण्यामागील कारण हेच असावे. खरे तर ज्याचे त्याचे खाजगी जीवन असते त्यात फारशी दाखल घेण्याची गरज नाही. मात्र, तिकडे सोमैय्या आपण निरपराध असल्याचे सांगत असले तरी त्यांचे लाईव्ह व्हिडीओ कॉल चॅट असे समोर आल्याने त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न काही अंशी सफल झाला असेच म्हणावे लागेल. ‘जो इतरांना नागडा करतो तो स्वतः आज झाला..’ अशा अर्थाची करण्यात येत असलेली विधाने हेच सूचित करतात.
मात्र, आता किरीट सोमैय्यांच्या खाजगी जीवनावरून बदनामीचा डाव कुणाच्या अंगलट येतो तेच येणाऱ्या काळात महाराष्ट्राला दिसणार आहे. किरीट सोमैय्यांना चारित्र्याचे प्रमाण पत्र कुणी द्यावे अथवा देऊ नये हा इथे चर्चेचा हेतू नाही. पुरोगामी महाराष्ट्रात चिखलफेकीचे राजकारण नव्याने सुरु करताना त्याचे परिणाम काय होतील, हे सुद्धा संबंधितांनी पाहणे गरजेचे होते, असे येथे आवर्जून सांगावेसे वाटते.