Startupमराठी

Organic Ganesha Idols : यंदा बसवूया..गोमय गणेश मूर्ती !

कशा बनतात, काय असतात त्यांची वैशिष्ट्ये.. आणि कुठे मिळतील? जाणून घ्या..

Organic Ganesha Idols म्हणजे, गोमय गणेश मूर्ती.. तुम्ही ऐकलंय का गोमय गणेश मुर्त्यांबद्दल? गेल्या वर्षी सुमारे पाच हजारावर अशा मुर्त्या बसविण्यात आल्या, हे ठाऊकाय? होय, हे खरे आहे. कशा बनतात, काय असतात त्यांची वैशिष्ट्ये.. आणि कुठे मिळतील? खास च्या वाचकांसाठी सगळं सांगताहेत, पर्यावरण प्रेमी आणि वैज्ञानिक विजय लिमये.. 

 

Organic Ganesha Idols
यंदा बसवूया..गोमय गणेश मूर्ती !

 

 

 

 

 

अनंत चतुर्दशीचा दिवस उजाडला, घरगुती, ऑफिस, सोसायटी, आणि सार्वजनिक बाप्पांची परतीची वेळ झाली. आपापल्या सोयीनुसार सकाळी आठ वाजल्यापासून मध्यरात्र उलटून जाईपर्यंत पाणवठ्यावर विसर्जन केले.

 

 

 

 

 

 

 

दिवस दुसरा:- मुंबई आणि इतर समुद्र किनारी, शहरातील तलावांवरचे दृश्य, छिन्न विच्छिन्न अवस्थेत गणेश मूर्तीची विटंबना झाली आहे. सर्वत्र, मूर्तीचे हात, तोंड, सोंड, पोटाचा घेर, पाय, तुटलेल्या अवस्थेत आपल्याला दिसत असतात. हीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात नद्यांच्या काठावर पाहायला मिळते.

 

हेच पाहण्यासाठी का आपण गणेश मूर्ती स्थापित करून दहा दिवस भक्तिभावे पूजा करतो?, विसर्जन पश्च्यात भंगलेल्या मूर्तीची विटंबना होते, हे न कळण्याइतपत आपण अज्ञानी आहोत का? साक्षात भगवंताला हे चित्र पाहून स्वतःचीच करूणा येत असावी. असो.

 

Organic Ganesha Idols म्हणजे, गोमय गणेश मूर्ती..

 

Organic Ganesha Idols
यंदा बसवूया..गोमय गणेश मूर्ती !

 

 

 

गोमय वसते लक्ष्मी, (शेणामध्ये लक्ष्मीचा वास असतो) असे हिंदू धर्मात मानले जाते. आता पुढची क्रांती गोमय गणपतीची राहणार आहे. गोमय गणपती म्हणजेच गाईच्या शेणापासून बनवलेल्या बाप्पाच्या मूर्ती. गोमय मूर्तींचा फायदा असा, की वजनाला अतिशय हलक्या असतात. बनविण्यासाठी गोमय वापरल्याने पर्यावरणास कोणतीच हानी होत नाही, उलट झाला तर त्याचा लाभच होतो.

 

 

 

 

 

 

 

पुढे गोमय गणपती बनवणाऱ्या कारागिरांना आवाहन आणि विनंती आहे, गोमय बाप्पा अतिशय हलके असल्याने, त्यांचे वजन वाढवण्यासाठी त्यांच्या पोटात धान्य भरावे, म्हणजे वजनी बाप्पा स्थिर राहतील.

 

धान्य भरलेले गोमय गणपती कोणत्याही नैसर्गिक जलाशयात जसे विहीर, तलाव, नदी अथवा समुद्रात विसर्जित करण्यास हरकत राहणार नाही, त्याचा जलाशयातील जीवांना फार मोठा फायदा मिळणार आहे.

 

 

साधारण श्रावण महिन्यात मासे जलाशयात अंडी देतात आणि पुढे काही दिवसात अंड्यातून पिल्ले जन्माला येतात. अनंत चतुर्दशीच्या आसपास, जन्माला आलेल्या पिल्लांना गोमय आणि धान्य खायला मिळेल. मोठे मासे छोट्या पिल्लांना पकडण्यासाठी आटापिटा करण्यापेक्षा, आपले पोट भरण्यासाठी सहज उपलब्ध झालेले मोड आलेले धान्य खातील, याप्रकारे सर्व मासे आणि जिवजंतूना मुबलक अन्न मिळू लागले तर, मोठे मासे लहान मासोळी खातील पण कमी संख्येने, ज्याचा परिणाम पिल्ले जगण्याची शक्यता वाढेल. जगण्याची शक्यता वाढल्यामुळे, पुढे जास्त संख्येने पिल्ले मोठी होणार, आणि पूर्ण वाढ झालेल्या मासोळ्या अलगद माणसांच्या ताटातून पोटात जाणार. अर्थात “जीवो जीवस्य जीवनम्” शृंखला पूर्ण होणार.

 

 

 

Organic Ganesha Idols
म्हणजे, गोमय गणेश बाप्पा ..

Organic Ganesha Idols म्हणजे, गोमय गणेश बाप्पा ..

 

 

गोमय बाप्पा सर्वार्थाने पर्यावरणपूरक ठरतील. शेण खताचा पाण्यातील वनस्पतींना उपयोग होणार.

 

 

 

बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, सकारात्मक बदल केल्याने वसुंधरा सुंदर, निर्मळ, टवटवीत, राहील, हिच तर आपल्या येणाऱ्या पिढीला अमूल्य भेट असेल.

 

 

 

 

गणेश पूजन, लक्ष्मी पूजन, पर्यावरण/निसर्ग पूजन (प्रदूषण रोखले जाते), जल सजीवांना अन्नदान (अन्नदान – श्रेष्ठ दान), वनस्पतींना अन्न दान. एकूणच गोमय गणेशाचे इतके फायदे आहेत.

 

जिवजंतूंचे रक्षण करोनी, हातून पुण्यकर्म घडवू. सर्वात महत्त्वाचे, कोणत्याही गोमय गणेश मूर्तीची विटंबना होणार नाही. हात, पाय, सोंड, तोंड इतस्ततः भग्न अवस्थेत दिसणार नाही.

 

 

Organic Ganesha Idols
यंदा बसवूया..गोमय गणेश मूर्ती !

 

 

चला तर मग, यावर्षीपासून संकल्प करू l
नको शाडू, नको पीओपी,
केवळ गोमय बाप्पाच घरी आणू ll

 

 

 

 

 

 

 

 

 

Organic Ganesha Idols कुठे मिळतील?

 

गोमय गणेश मूर्तीसाठी यांना संपर्क करावा :

1. सुचित्राजी गडद, सोलापूर ‪ +919511695979‬.
2. गणेशजी गुंडमी, सोलापूर ‪ +919577955577.
3. तुलसिजी सारडा, लासलगाव, नाशिक ‪+917775916185‬.
4. महादेवजी शिर्के, कोल्हापूर  9892773809, 7822927308, 9082474030.
5. गुलाबकाका यादव, तासगाव, सांगली 9096944006, 7972406452.
6. राजशेखरजी कोळी, बेळगांव, कर्नाटक 9482303039.
7. विश्वास पाटकर, मुंबई 9819106503.
8. स्वानंद 7879760060.
9. तृप्ती अकुलवार, पुणे 9075795049, 8237003660, 8408886626.
10. सुदेश गडद पुणे 9822669193.

 

फोन कराल तेव्हा http://www.indiainput.comचा आणि या लेखाचा उल्लेख अवश्य कराल. हा ब्लॉग देखील सर्वांसोबत नक्की शेयर करा.. ll गणपती बाप्पा मोरया ll

 

(Pics by Mahadeo Shirke, Kolhapur) 

……….

 

Author Vijay Limaye on FB..

https://www.facebook.com/ECO.FRIENDLY.CREMATION/

 

More about Vijay Limaye in national media..

https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/man-who-saved-10000-trees-last-year/articleshow/82360327.cms

 

https://www.lokmat.com/nagpur/vijay-limaye-supplementary-options-eco-friendly-funeral-cremation-two-crore-plants-country/

 

 

More about the author, or by the author on http://www.indiainput.com

 

मोक्षकाष्ठ वाले विजय लिमये..जो पेडोंको जीवनदान देते हैं!

मोक्षकाष्ठ वाले विजय लिमये..जो पेडोंको जीवनदान देते हैं!

 

#JunkRemoval अडगळीच्या, अनुपयोगी वस्तू पडून आहेत? हे वाचा..

#JunkRemoval अडगळीच्या, अनुपयोगी वस्तू पडून आहेत? हे वाचा..

 

Digital Transactions नोकऱ्या घेणार, जग बदलणार आहे..!!

Digital Transactions नोकऱ्या घेणार, जग बदलणार आहे..!!

 

चला, आपल्या शहराला FLOWER CITY फुलांचे शहर करूयात!

चला, आपल्या शहराला FLOWER CITY फुलांचे शहर करूयात!

 

Kashi: काशी बदलली.. काशीवासी कधी बदलणार?

Kashi: काशी बदलली.. काशीवासी कधी बदलणार?

 

Left handers डावखुऱ्या व्यक्तींचे विश्व: भेदभाव, ऊंच यश!

Left handers डावखुऱ्या व्यक्तींचे विश्व: भेदभाव, ऊंच यश!

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

two × three =

Back to top button