मराठी

#GlobalGanesha: US च्या पिट्सबर्गमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहिला का?

पिट्सबर्ग मराठी मंडळ आणि हिंदू युवा यांच्या उपक्रमांची क्षणचित्रे..

#GlobalGanesha#GlobalGanesha: यंदा जगभरात गणेशोत्सवाची ऊर्जा, झळाळी आणि धडाका काही औरच आहे. त्यात अमेरिकेतील पिट्सबर्ग मराठी मंडळ आणि हिंदू युवा यांच्या उपक्रमांना प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. इंडिया इन्पुटच्या जगभर पसरलेल्या परिवारासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकेचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी घडवून आणलेली ही खास पिट्सबर्ग ची यात्रा..

 

अमेरिकेतील पिट्सबर्ग शहरात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. पिट्सबर्ग मराठी मंडळातर्फे हिंदू जैन मंदिर येथे आयोजित गणेशोत्सवाबरोबरच हिंदू युवा यांच्या पुढाकाराने कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटी (CMU) परिसरातही गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

 

या दोन्ही उपक्रमांमधून पिट्सबर्गमधील भारतीय आणि मराठी समुदायाचा सांस्कृतिक उत्साह तसेच पुढील पिढीला भारतीय परंपरांशी जोडण्याचा प्रयत्न दिसून आला.

हिंदू जैन मंदिरात मराठमोळ्या वातावरणात गणरायाचे आगमन

#GlobalGanesha

 

१९ सप्टेंबर रोजी पिट्सबर्ग मराठी मंडळातर्फे हिंदू जैन मंदिर येथे गणेशोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. पिट्सबर्ग शहर तसेच परिसरातील विविध उपनगरांतून सुमारे ३५० ते ४०० मराठी बांधव या सोहळ्यासाठी एकत्र आले. पारंपरिक ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले.

 

#GlobalGanesha

पारंपरिक पोशाखात आणि लेझिमच्या तालावर बाप्पाच्या मूर्तीचे स्वागत करत, तिची स्थानिक मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली.

#GlobalGanesha
या प्रसंगी भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत पेलून सर्व ग्रामस्थांचे संरक्षण केल्याचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता.  विधिवत गणपती स्थापना आणि आरती झाली. आरतीनंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

 

यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते “गोवर्धन पर्वत गिरिधारी कृष्ण कन्हैया” या संकल्पनेवर आधारित भव्य प्रकाश, ध्वनी आणि चलतचित्र सादरीकरण.

#GlobalGanesha

हालचाली, प्रकाशयोजना आणि ध्वनी यांच्या सुंदर मिलाफातून साकारलेला हा देखावा पाहून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या अभिनव सादरीकरणाचा आनंद घेतला.

 

पिट्सबर्ग मराठी मंडळाचे अध्यक्ष यशोधन डोंगरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (BMM) अध्यक्ष राहुल देशमुख यांनी उपस्थित भाविक, स्वयंसेवक आणि कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

 

#GlobalGanesha

 

पिट्सबर्ग मराठी मंडळाचा गणेशोत्सव सात दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह सुरू असून, २६ सप्टेंबर, शनिवार रोजी सायंकाळी गणेश विसर्जन करण्यात येणार आहे.

 

CMU परिसरात हिंदू युवांचा उत्साह

 

गणेशोत्सवाचा उत्साह पिट्सबर्गमधील विद्यापीठ परिसरातही पाहायला मिळाला. हिंदू युवा यांच्या पुढाकाराने Carnegie Mellon University (CMU) च्या कॅम्पसमध्ये गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे ७५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

 

#GlobalGanesha

 

येथील एकदम खास असे वैशिष्ट्य म्हणजे खुद्द विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन श्री गणेशाची मूर्ती तयार केली आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. परदेशातील विद्यापीठ परिसरात शिक्षण घेत असताना भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि परंपरांशी जोडलेले राहण्याचा हा विद्यार्थ्यांचा सुंदर प्रयत्न ठरला.

 

#GlobalGanesha

 

फक्त मराठीच नव्हे तर, सर्व भारतीय विद्यार्थ्यांच्या सामूहिक सहभागामुळे CMU परिसरात उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. विविध शहरांमधून आणि भारतातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत गणेशोत्सव साजरा केल्याने “विविधतेतून एकता” या भारतीय संस्कृतीच्या मूल्याचे दर्शन घडले.

 

पिट्सबर्गमधील मंदिर, मराठी मंडळ आणि विद्यापीठ परिसरात साजरे होणारे हे विविध गणेशोत्सव उपक्रम अमेरिकेतील भारतीय समुदायासाठी केवळ धार्मिक उत्सव न राहता संस्कृती, परंपरा आणि पुढील पिढीला आपल्या मुळांशी जोडणारा उत्सव ठरत आहेत.

 

SOURCE :  

https://www.a2mm.org/

https://www.instagram.com/annarbormarathimandal/

https://www.facebook.com/annarbormarathimandal

https://www.cmu.edu/

http://www.hindujaintemple.org

 

FEEDBACK : Contact@indiainput.com

 

CATCHUP FOR MORE ON : http://indiainput.com

#GlobalGanesha: US मधील ऑरलँडोचा गणपती राजा! 

#GlobalGanesha: बर्मिंगहॅममध्ये गणपती सजावटीत वाराणसीची गंगा आरती!

#GlobalGanesha: यूकेच्या कानाकोपऱ्यात बाप्पाचा जयघोष!

#GlobalGanesha: लंडन मध्ये 2 दिवसांच्या गणेशोत्सवात 10 हजारांची गर्दी..!

GANESH FESTIVAL @ABU DHABI: EXCLUSIVE GLIMPSES

 

India Input

A web magazine viewed by readers across the globe. Created, owned and managed by INDIA INPUT COMMUNICATIONS, that brings out the latest interesting trends in India and outside on a range of topics, especially the important trends in geopolitics, social media, innovation, start ups, industry, business besides others.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button